सकाळी सकाळी बागेत फिरायला गेल्यावर किंवा रस्त्यावर चालायला गेल्यावर खूप छान वाटतं..,…कित्ती लोक फिरत आहेत..आता आपल्या तब्येती बद्दल किती जागरूक झाले आहेत लोक हे बघून बरं वाटतं…..आजकाल ओपन जिम पण झाले आहेत….तिथे पण लोक व्यायाम करत असतात…वाह…
तरी पण एक फिजओथेरपिस्ट म्हणून माझं लक्ष असतच….
अरे हे काय चाललंय ?
आपली तब्येत आपलं शरीर याचा विचार न करताच अघोरी व्यायाम सुरू असतो…..कोणी जाडजूड व्यक्ती आपल्या गुड ग्यांचा ,हुदयाचा विचार न करताच पळत आहेत…कोणी अतिरेकी उड्या मारत आहे,कोणी टेकड्या चढत आहे…..
अतिरेकी व्यायाम मग तो कोणताही असो..घातकच ठरतो.
रोज क्लिनिक मध्ये कमी वयात बिघडलेले…हो खरच बिघडलेले रुग्ण येत असतात.
त्यांचं एकमेव उद्दिष्ट असतं….वजन कमी ठेवणे आणि फिट राहणे….
त्या साठी ते वाट्टेल ते म्हणजे वाट्टेल ते करत असतात…..
जसे…आम्ही रोज पर्वती चढतो पाच वेळा….रोज सायकलिंग करतो 20 किलोमिटर….इत्यादी……
आता यात आपल्या वयाचा ,शरीर प्रकृती चा कुठेही विचार नसतो.
त्यामुळे लवकरच गूढगेदुखी,पाठ दुखी…असे प्रकार सुरू होतात.पण अशा लोकांना सागितले की वाटते तो अमका माणूस करू शकतो तर मी का नाही ?
पण हे जाणून घेणे आवश्यक आहे की प्रत्येक शरीर वेगळे आहे.
प्रत्येक माणसाची प्रकृती वेगळी असल्याने सगळ्यांना सगळे मानवत नाही.म्हणून कुठलेही व्यायाम अतिरेकी करू नये.कारण एकदा झालेली झीज परत भरून येत नाही.
आपले आरोग्य ही अमूल्य संपदा आहे. योग्य व्यायाम आणि आहारानेच ती जपून ठेवता येईल.
Read In English : https://drsuvarnabhave.com/the-hidden-dangers-of-excessive-exercise-a-physiotherapists-perspective/
One Response